तीस जूनपर्यंत मिळकतकराची बिले भरून सवलत मिळवा महापालिकेचे नागरिकांना आवाहन

तीस जूनपर्यंत मिळकतकराची बिले भरून सवलत मिळवा महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मिळकतकराची बिले 30 जूनपर्यंत भरून विविध सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी शुक्रवारी  केले आहे. कर संकलन विभागाने सन 2022-23 वर्षांचे 950 कोटींचे उद्दिष्टये ठेवले आहे. आतापर्यंत एकूण 145 कोटींचा भरणा झाला आहे.

करसंकलन विभागामार्फत नागरिकांना जलद व सोप्या पद्धतीने सेवा मिळाव्यात, यासाठी नव्याने ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता ना देय दाखला, स्वयंमुल्य निर्धारण अशा सेवा देण्यात येत आहेत. तसेच, महिला, दिव्यांग व्यक्ती, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्‍या सोसायट्यांना सामान्य करामध्ये भरघोस सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतींचा लाभ घेण्याची मुदत 30 जूनपर्यंत आहे.

पालिकेकडे थकीत मिळकतकर असलेल्या मालमत्तांची संख्या 50 हजारांपेक्षा अधिक आहे. त्यांच्याकडील एकूण 400 कोटींची थकबाकी आहे. गेल्या वर्षी 36 हजार 399 मिळकतींना जप्तीपूर्व नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यापैकी 286 मिळकतींची जप्ती करण्यात आली होती. यंदा जवळपास 2 हाजर 700 मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

थकबाकीदारांनी कर भरून जप्तीची कारवाई टाळावी.पालिकेने मिळकतकर वसुलीची धडक मोहीम राबविली आहे. गेल्या आठवड्यात 2 व्यावसायिक मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. जप्तीची मोहीम यापुढे ही सुरू राहणार आहे. मिळकत जप्ती बरोबरच इतर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news