ताथवडेत वॉल लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया

ताथवडेत वॉल लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया

ताथवडे : येथील पुणे-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्यावरील एका मॉलजवळ असणार्‍या वॉलमधून रविवारी हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सध्या शहरवासियांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिना ओलांडला तरी अजूनही समाधानकारक पाउस झाला नाही.

परिणामी पाणी प्रश्न पेटलेला असताना काही ठिकाणी मात्र प्रशासनाच्या नियोजनाअभावी तसेच पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. ताथवडे येथील रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. अगोदरच या परिसरात दिवसाआड पाणी येत आहे. तसेच, कधीकाळी पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर पाण्याअभावी अनेकांचे हाल होतात.

त्यातच आता पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा वॉल गळतीकडे पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांचे पाण्याअभावी होणार्‍या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news