

हिंजवडी : अनेक वर्षांपासून हिंजवडीकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी सर्व शक्य असलेल्या पर्यायी मार्गावर काम सुरू आहेच. मात्र, हिंजवडीसाठी आता एमआयडीसीच्या वतीने आयटीनगरी सुमारे 10 लाख लिटर (1000 घनमीटर) पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
यापूर्वी 450 घनमीटर पाणीपुरवठा एमआयडीसीच्या वतीने करण्यात येत होता, त्यात अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वापरासाठी 25 लक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत ग्रामस्थांना दररोज 10 लक्ष लिटर पाणी मिळेल.
मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी एमआयडीसीकडे अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी मागणी केली होती. त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार देखील करण्यात आले होते. या निर्णयामुळे ग्रामस्थांची तहान भागणार आहे.
-शिवनाथ जांभुळकर,
सरपंच हिंजवडी ग्रामपंचायत