

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सन 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी बुधवार (दि.5) मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द केली. यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार एकूण मतदार 56901 आहेत. तर पुरुष मतदार 29401 व महिला मतदार 27500 आहेत, अंतिम मतदार यादी प्रसिध्द होताच इच्छुक उमेदवारांची अंतिम मतदार यादी पाहण्यास गर्दी होत आहे.
शासनाच्या आदेशान्वये तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून प्रथम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. त्यांनतर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक जणांनी आक्षेप घेतले.व दिनांक 5 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. याबाबत सर्व माहिती उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्व 14 प्रभागांमध्ये एकूण मतदान, पुरुष मतदार. महिला मतदार पुढील प्रमाणे.
प्रभाग क्र – 1 – एकूण मतदान- 4780, पुरुष मतदार – 2602, महिला मतदार – 2178.
प्रभाग क्र – 2 – एकूण मतदान- 4593, पुरुष मतदार – 2453, महिला मतदार – 2130.
प्रभाग क्र – 3 – एकूण मतदान- 4487, पुरुष मतदार – 2253, महिला मतदार – 2234.
प्रभाग क्र – 4 – एकूण मतदान- 4684, पुरुष मतदार – 2424, महिला मतदार – 2259.
प्रभाग क्र – 5 – एकूण मतदान- 3430, पुरुष मतदार – 1732, महिला मतदार – 1693
प्रभाग क्र – 6 – एकूण मतदान- 3460, पुरुष मतदार – 1839, महिला मतदार -1621.
प्रभाग क्र – 7 – एकूण मतदान- 3691, पुरुष मतदार – 1878, महिला मतदार -1813.
प्रभाग क्र – 8 – एकूण मतदान-3941, पुरुष मतदार – 2092, महिला मतदार – 1849,
प्रभाग क्र – 9 – एकूण मतदान- 4630, पुरुष मतदार -2332, महिला मतदार -2298,
प्रभाग क्र -10 – एकूण मतदान- 3197, पुरुष मतदार – 1597, महिला मतदार – 1600.
प्रभाग क्र – 11 – एकूण मतदान- 4294, पुरुष मतदार – 2186, महिला मतदार – 2108,
प्रभाग क्र – 12 – एकूण मतदान- 4018, पुरुष मतदार – 2023, महिला मतदार -1995,
प्रभाग क्र – 13 – एकूण मतदान- 4244, पुरुष मतदार – 2187, महिला मतदार -2057,
प्रभाग क्र – 14 – एकूण मतदान- 3462, पुरुष मतदार – 1802, महिला मतदार – 1660
या प्रमाणे प्रभाग निहाय मतदारांची संख्या असून प्रारूप,अतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर संस्था, पक्ष, संघटना व इच्छुक उमेदवारांनी घेतलेले आक्षेपाच्या नुसार बदल केले कि नाही, याची पडताळणी सुरु असून निवडणुका नक्की कधी होणार याबाबत चर्चा सुरु आहे.