

तळवडे : पुढारी वृत्तसेवा: देहू-आळंदी रोडवरील तळवडे मुख्य चौकालगत असलेल्या दुभाजकाच्या दुरवस्थेचे वृत 'दैनिक पुढरी'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने दुभाजकाची दुरूस्ती केली आहे. तळवडे मुख्य चौकालगत देहू-आळंदी रोडवरून भूमिगत जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे. या वेळी रस्ता खोदताना दुभाजकाचे ब्लॉक्स निखळून गेले होते.
जलवाहिनीचे काम संपल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला होता. परंतु, खोदताना खराब झालेला दुभाजक तसाच दुर्लक्षित राहिला होता. या दुभाजकाचा वाहतुकीस अडथळा होत होता. तसेच, दुभाजकामधील माती रस्त्यावर पसरली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती या आशयाचे वृत 'पुढारी'ने प्रसिद्ध करताच अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असलेल्या दुभाजकाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत दुरूस्ती केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.