तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून

तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पुणे : हवेली तालुक्यातील थेऊरमध्ये एका तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ( दि. 5) उघडकीस आली. येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळला. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कारखान्याच्या मोकळ्या जागेत मंगळवारी पहाटे स्थानिक नागरिकांना एका तरुणीचा मृतदेह आढळला.

त्यांनी या घटनेची माहिती तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक सुभाष काळे व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी गेले. तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. तरुणीची नेमकी ओळख पटली नाही. डोक्यात दगड घातल्याने मोठा रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news