तब्बल दोन वर्षांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी जल्लोषात

पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील गणेश मित्रमंडळ दहीहंडी संघाच्या गोविंदांनी सहा थर लावून फोडली. (छाया : यशवंत कांबळे)
पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील गणेश मित्रमंडळ दहीहंडी संघाच्या गोविंदांनी सहा थर लावून फोडली. (छाया : यशवंत कांबळे)
Published on
Updated on

पुणे/पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. डीजेचा दणदणाट, ढोल-गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, आकर्षक लेझर लाइट्स, गाण्यांच्या स्वरात थिरकणारी तरुणाई, बाळगोपाळांचा धिंगाणा, ठिकठिकाणी सेलिब्रिटींची गर्दी… असे वातावरण ठिकठिकाणी पाहायला मिळाले. पुणे शहरातील तरुणाईची आकर्षणाची ठिकाणे असलेल्या हुतात्मा बाबू गेनू तरुण मंडळ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ, अखिल मंडई मंडळ येथे दहीहंडी पाहण्यासाठी शुक्रवारी तुफान गर्दी उसळली होती. मध्यवस्तीतील पेठांमधील छोट्या मंडळांनी सायंकाळी आठनंतरच बहुतेक दहीहंडी फोडायला सुरुवात केली.

पिंपरी-चिंचवड परिसरातील बाळगोपाळांमध्ये शुक्रवारी (दि. 19) दहीहंडीचा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. त्यातच सायंकाळी शहरवासीयांना वेध लागले ते दहीहंडीचे. गेल्या दोन वर्षांनंतर यंदा शहरातील सार्वजनिक मंडळांकडून दहहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाणे, चेंबूर या ठिकाणच्या गोविंदा पथकांनी शहरात हजेरी लावली होती. एकंदरीत, दहीहंडीनिमित्ताने शहरात जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news