

जुन्नर : पारुंडे (ता. जुन्नर) येथून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. शनिवारी रात्री 12 ते 2 दरम्यान ही घटना घडली. मुलीच्या आईने जुन्नर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून निखिल संजय गायकवाड (रा. पारुंडे, ता. जुन्नर) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार तपास करीत आहेत.