जिल्ह्यात अडीच वर्षांत 25 लाख सातबारा डाउनलोड

जिल्ह्यात अडीच वर्षांत 25 लाख सातबारा डाउनलोड

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्या महसूल विभागाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या महाभूमी संकेतस्थळावरून पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आतापर्यंत सर्वाधिक 25 लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि 6.38 लाख खाते उतारे डाउनलोड केले आहेत.
संपूर्ण राज्यात आतापर्यंत 2.21 कोटी डिजिटल सातबारा उतारे, तर 61.42 लाख डिजिटल खाते उतारे आणि 4.87 लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त फेरफार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घेतले आहेत. या माध्यमातून प्रतिउतारा 15 रुपयेप्रमाणे राज्य शासनाला 45 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

महसूल विभागाकडून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, फेरफार उतारा, आठ-अ खाते उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या सुविधांचा उपयोग नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यानुसार राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सातबारा उतारे डाउनलोड करण्यात आले आहेत. त्यानंतर सोलापूर, नगर आणि सातारा जिल्ह्यांचा क्रमांक आहे, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यभरातून डाउनलोड झालेले सातबारा
पुणे 25 लाख नऊ हजार 570, सोलापूर 14 लाख 77 हजार 360, नगर 14 लाख 12 हजार 124, सातारा 13 लाख 54 हजार 902, नाशिक 11 लाख 24 हजार 926, औरंगाबाद दहा लाख 58 हजार 288, नांदेड दहा 45 हजार 785, जळगाव दहा लाख 20 हजार 576, कोल्हापूर नऊ लाख 20 हजार 595, सांगली आठ लाख 55 हजार 690, अकोला सात लाख 50 हजार 830, जालना सहा लाख 89 हजार 402, अमरावती सहा लाख 44 हजार 925, उस्मानाबाद – सहा लाख दोन हजार 623, बीड पाच लाख 90 हजार 386, वाशिम पाच लाख चार हजार 319, ठाणे – चार लाख 85 हजार 634, बुलडाणा चार लाख 69 हजार 754, यवतमाळ चार लाख 66 हजार 439, चंद्रपूर – चार लाख 49 हजार 60, रत्नागिरी – तीन लाख 96 हजार 970, हिंगोली – तीन लाख 87 हजार 994, रायगड – तीन लाख 79 हजार 213, धुळे – तीन लाख 68 हजार 794, परभणी – तीन लाख 38 हजार 154, पालघर – तीन लाख 34 हजार 31, सिंधुदुर्ग – दोन लाख 86 हजार 467, नागपूर – दोन लाख 84 हजार 692, लातूर – दोन लाख 57 हजार 471, गोंदिया – दोन लाख पाच हजार 612, नंदुरबार – एक लाख 86 हजार 321, वर्धा – 89 हजार 936, भंडारा – 88 हजार 560 आणि गडचिरोली – 62 हजार 279.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news