जलशक्ती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांची पाहणी

जलशक्ती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांची पाहणी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जलशक्ती अभियान अंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांची केंद्रीय पथकाने क्षेत्रीय भेटी देऊन पाहणी केली. या वेळी अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कौतुक केले. केंद्रीय 'कॅच द रेन'अंतर्गत जिल्ह्यातील झालेल्या कामांबाबत आढावा बैठक घेतली. या वेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या संचालिका स्मिता श्रीवास्तव, केंद्रीय जल, ऊर्जा व संशोधन संस्थेचे वैज्ञानिक सरबजित सिंग, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार, तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पथकाने शिरूर व खेड तालुक्यातील मृद् व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, सिमेंट नाला बंधारे, तसेच मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. खेड येथील वनविभागाच्या नर्सरीला भेट दिली. शिरूर नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भेट देऊन इमारत सौरऊर्जेवर कार्यान्वित असल्याबद्दल, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम प्रशंसनीय असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news