चौदाव्या मजल्यावरून विद्यार्थिनीची उडी

www.pudhari.news
www.pudhari.news

पुणे : हडपसर येथील अमानोरा पार्क येथील विद्यार्थिनीने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्री उशिरापर्यंत तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अवंतिका कुलशेखर (वय 17, रा. अमानोरा पार्क) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतिका मांजरी परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत होती.

शुक्रवारी तिच्या शाळेत पालक मेळावा होता. त्यासाठी तिचे आई-वडील शाळेत गेले होते, तर तिचा लहान भाऊदेखील शाळेत गेला होता. त्या वेळी ती घरी एकटीच होती. सकाळी आई-वडील पालक मेळाव्यावरून परत आले. लिफ्टने जात असतानाच तिने घराचा दरवाजा आतून बंद करून चौदाव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news