

राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या चासकमान धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. आज (दि.३) सकाळी ६ वाजता धरण ९७.३२ टक्के भरले. धरण सूरक्षा धोरणानुसार धरणाच्या दरवाज्यातून कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू हाेणार आहे. नदीकाठच्या गाव,वस्त्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन चासकमान जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी केले आहे.
धरण क्षेत्र असलेल्या खेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी भीमाशंकर खोऱ्यात पाऊस आहे.
पावसामुळे नदीचे मुख्य पात्र व परिसरातील ओढे. नाले तुडूंब वाहात आहेत.
पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत आहे.
यापूर्वी विद्युत गृहाद्वारे डाव्या कालव्यात ५५० कुसेक्स वेगाने विसर्ग सुरू ठेवलेला आहे .मंगळवारी धरण ९७.३२ टक्के भरले.
कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सुरु हाेण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भिमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदी काठावर असणारे विदूयतपंप, शेती अवजारे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होणार आहे. याची नोंद नागरिकांनी घ्यावी.असा सतर्कतेचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
हे ही पाहा :