पुणे
चाकण : शस्त्र बाळगणार्या एकास अटक
चाकण : शस्त्र बाळगल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस शिपाई योगेश्वर कोळेकर यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषीकेश जयवंत शिंदे (वय 19, रा. धानोरे, ता. खेड) याला अटक करून त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे.
चाकण औद्योगिक हद्दीत भाई बनू पाहणारे तरुणांकडे कोयता, तलवार, गावठी पिस्तूल अशी शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. याच शस्त्राच्या बळावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषतः चाकण औद्योगिक भागात असे प्रकार अनेकदा समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घटनांचा गांभीर्याने तपास करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

