चाकण पंचक्रोशीत संततधार

चाकण पंचक्रोशीत संततधार
Published on
Updated on

चाकण : पुढारी वृत्तसेवा; चाकण पंचक्रोशीत मंगळवारी (दि. 5) दुपारपासून मध्यम स्वरूपाच्या संततधार पावसाने जोर धरला आहे. संततधार पावसाचा अनुभव यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नागरिकांना अनुभवण्यास मिळाला. दुपारपासून मध्यम पाऊस या परिसरात बरसतो आहे. चाकण पंचक्रोशीतील वाकी, खराबवाडी, महाळुंगे, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कुरुळी, निघोजे, खालुंब्रे, सावरदरी, भांबोली, शिंदे, वासुली, आंबेठाण, चिंबळी, मोई, कडाचीवाडी, बिरदवडीसह सर्वदूर संततधार पावसाने हजेरी लावली आहे.

या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी मध्यम, तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. शेतीच्या दृष्टीने या पावसाचा लाभ होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी दमदार पावसाची शेतकरी व नागरिकांना अपेक्षा आहे. सायंकाळी काही काळ पावसाने उसंत घेतली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news