चाकण : तरकारी मालाच्या भावात वाढ; कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण

file photo
file photo
Published on
Updated on

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पावसामुळे आवक घटल्याने तरकारी मालाच्या भावात वाढ झाली. कांद्याची आवक वाढल्याने भावात आणखी घसरण झाली. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू व पालकच्या भावात वाढ झाली. पावसात भिजलेल्या भाज्या मात्र अवघ्या 5 रुपये जुडीने विक्री झाल्या. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल व म्हशींच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 2 कोटी 80 लाख रुपये झाली. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1 हजार 500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 600 क्विंटलने वाढल्याने भावात 200 रुपयांची घसरण झाली.

कांद्याचा कमाल भाव 1,600 रुपयांवरून 1,400 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 2,500 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 700 क्विंटलने वाढूनही भावात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,100 रुपयांवरून 2,200 रुपयांवर पोहचला. जळगाव भुईमूग शेंग व बंदूक भुईमूग शेंगाची या आठवड्यात काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भाव 4 हजार रुपयांवरच स्थिरावले. टोमॅटोची 228 क्रेट आवक होऊन मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली.

टोमॅटोला प्रतिकिलोस 10 ते 20 रुपये एवढा घाऊक बाजारात भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 295 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,400 रुपये. भाव क्रमांक 2. 1,200. भाव क्रमांक 3. 1,000. बटाटा : एकूण आवक – 2,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,200. भाव क्रमांक 2. 1,850. भाव क्रमांक 3. 1,600.

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो – 228 क्रेट (1 ते 2 हजार रुपये), कोबी – 158 क्विंटल (1,500 ते 2,500), फ्लॉवर – 173 क्विंटल (1,500 ते 2,500), वांगी – 69 क्विंटल (4 ते 5 हजार), भेंडी – 47 क्विंटल (4 ते 5 हजार), दोडका – 57 क्विंटल (3 ते 4 हजार), कारली – 64 क्विंटल (2,500 ते 3,500 रुपये), दुधीभोपळा – 63 क्विंटल (1 ते 2 हजार), काकडी – 71 क्विंटल (1 ते 2 हजार), फरशी – 8 क्विंटल (10 ते 12 हजार), वालवड – 34 क्विंटल (4 ते 6 हजार), गवार – 54 क्विंटल (4,500 ते 5,500 रुपये), ढोबळी मिरची – 118 क्विंटल (1,500 ते 4,500.), चवळी – 29 क्विंटल (3 ते 4 हजार), वाटाणा – 30 क्विंटल (8 ते 10 हजार), शेवगा – 20 क्विंटल (4 ते 5 हजार), गाजर – 29 क्विंटल (2 ते 3 हजार).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 14 हजार 540 जुड्या (1,500 ते 2,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 530 जुड्या (1 ते 1,500 रुपये), शेपू – एकूण 2 हजार 950 जुड्या (500 ते 1,000 रुपये), पालक – एकूण 3 हजार 480 जुड्या (500 ते 700 रुपये).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 67 जर्शी गायींपैकी 42 गायींची विक्री (15 ते 45 हजार), 85 बैलांपैकी 62 बैलांची विक्री (15 ते 35 हजार), 148 म्हशींपैकी 86 म्हशींची विक्री (25 ते 60 हजार), 8,250 शेळ्यांपैकी 7,630 शेळ्यांची विक्री (2 ते 12 हजार). बोकडांची एकूण संख्या 125 झाली असून, त्यापैकी 45 बोकडांची विक्री झाली. बोकडांना 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news