चाकण : टँकरच्या धडकेत कामगार ठार: एक जण जखमी

चाकण : टँकरच्या धडकेत कामगार ठार: एक जण जखमी

चाकण; पुढारी वृत्तसेवा: कंपनीच्या गेटवर कार्ड पंचिंग करीत असलेला तरुण कामगार पाण्याच्या टँकरखाली चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी (दि. 4) सकाळी सहाच्या सुमारास घडली. चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) येथील कोरस इंडिया कंपनीच्या प्रवेशद्वारावर हा अपघात झाला.

अजिंक्य अशोक चाळक (वय 19, सध्या रा. खराबवाडी; मूळ रा. कळंब, जि. उस्मानाबाद) असे या अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. अजिंक्य सकाळी पहिल्या पाळीसाठी कामावर आला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीच्या प्रवेशद्वारावर कार्ड पंचिंग करून कामावर जात असताना कंपनीतून आलेल्या पाण्याच्या टँकरखाली चिरडून तो ठार झाला. या अपघातात आणखी एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महाळुंगे पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news