चाकण : कोबी, मिरची, फ्लॉवरचे भाव वधारले; कांद्याची आवक स्थिर

चाकण बाजारात झालेली तरकारी मालाची आवक.
चाकण बाजारात झालेली तरकारी मालाची आवक.
Published on
Updated on

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कोबी, हिरवी मिरची व फ्लॉवरचे भाव किंचित वधारले. बटाट्याची आवक व भाव स्थिर आहेत. कोथिंबीर, शेपू व पालकची मोठी आवक झाली. मेथीची आवक घटून भावात घट झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल व म्हशींच्या संख्येत वाढ झाली. शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट होऊनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 3 कोटी 10 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 2 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून भावात 100 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 1,500 रुपयांवरून 1,400 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 3 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून कमाल भावही 2,200 रुपयांवर स्थिरावले.

जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 5 क्विंटलने घटून कमाल भावही 4 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 280 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 10 क्विंटलने वाढून भावात मोठी वाढ झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा : एकूण आवक – 2 हजार क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,400 रुपये, भाव क्रमांक 2. 1,250 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा : एकूण आवक – 3 हजार क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,200 रुपये, भाव क्रमांक 2. 1,900 रुपये, भाव क्रमांक 3. 1,700 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मिळालेला भाव कंसात पुढीलप्रमाणे :

टोमॅटो : 226 क्विंटल (500 ते 1 हजार रुपये), कोबी – 164 क्विंटल (1 हजार ते 1,500), फ्लॉवर – 170 क्विंटल ( 1,500 ते 2,500), वांगी – 111 क्विंटल (3 ते 5 हजार), भेंडी – 62 क्विंटल (2 ते 4 हजार), दोडका – 56 क्विंटल ( 4 ते ते 5 हजार), कारली – 64 क्विंटल (2,500 ते 3,500), दुधीभोपळा : 63 क्विंटल (1 ते 2 हजार), काकडी – 71 क्विंटल ( 1 ते 2 हजार), फरशी – 8 क्विंटल (10 ते 12 हजार), वालवड – 34 क्विंटल (4 ते 6 हजार), गवार – 54 क्विंटल (4,500 ते 5,500), ढोबळी मिरची – 118 क्विंटल (1,500 ते 4,500), चवळी – 29 क्विंटल (3 ते 4 हजार), वाटाणा – 100 क्विंटल (4 ते 6 हजार), शेवगा – 15 क्विंटल (3 ते 4 हजार), गाजर – 45 क्विंटल (2 ते 3 हजार).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेला भाव पुढीलप्रमाणे –
मेथी : एकूण 13 हजार 260 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), कोथिंबीर – एकूण 40 हजार 150 जुड्या (400 ते 1,000), शेपू – एकूण 3 हजार 850 जुड्या (1,000 ते 1,500), पालक – एकूण 4 हजार 160 जुड्या (500 ते 1,000).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 90 जर्शी गायींपैकी 75 गायींची विक्री (15 ते 50 हजार ), 110 बैलांपैकी 85 बैलांची विक्री (15 ते 35 हजार), 177 म्हशींपैकी 140 म्हशींची विक्री (25 ते 60 हजार), 5,370 शेळ्यांपैकी 5,130 शेळ्यांची विक्री (2 ते 12 हजार).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news