चाकण एमआयडीसीतील फोर्जिंग कंपनीत आग

चाकण एमआयडीसीत मेटालिक फोर्जिंग कपंनीत लागलेल्या आगीत भस्मसात झालेली ऑइलची टाकी. (छाया : अविनाश दुधवडे)
चाकण एमआयडीसीत मेटालिक फोर्जिंग कपंनीत लागलेल्या आगीत भस्मसात झालेली ऑइलची टाकी. (छाया : अविनाश दुधवडे)

चाकण; पुढारी वृत्तसेवा: चाकण एमआयडीसीत आळंदी फाट्याजवळ असललेल्या मेटालिक फोर्जिंग कपंनीमध्ये बुधवारी (दि. 17) सायंकाळी आग लागली. चाकण एमआयडीसी व नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने अवघ्या 45 मिनिटांत ही आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. चाकण एमआयडीसी, अग्निशमन केंद्राच्या अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले की, मेटालिक फोर्जिंग कंपनीमध्ये दुचाकीचे सुट्टे भाग तयार करण्याचे काम चालते. कंपनीतील ऑइलच्या टाकीला आग लागली होते.

टाकीच्या छतावरील पत्र्यांना आगीची झळ बसली. तेथून धुराचे लोट बाहेर येत होते. कंपनीतील कर्मचारी बाहेर आले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. ही आग कपंनीच्या इतर भागात पसरण्यापूर्वीच चाकण एमआयडीसी व नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या 45 मिनिटांत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news