घोरपडी बाजारात कचराकुंडीत अर्भक

घोरपडी बाजारात कचराकुंडीत अर्भक

पुणे: घोरपडी बाजार परिसरातील कचराकुंडीत पुरुष जातीचे अर्भक फेकून दिल्याची घटना 30 जूनला उघडकीस आली आहे.
अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असल्याने त्याला फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला कॅन्टोन्मेंटमध्ये साफसफाई करण्याचे काम करतात.

30 जूनला सकाळी सातच्या सुमारास घोरपडी बाजार परिसरातील कचराकुंडीत त्यांना अर्भक रडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी कुंडीत पाहिले असता, अर्भक दिसून आले. परिसरातील नागरिकांनी वानवडी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन अर्भकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news