घरपोच गॅसचे रस्त्यावरच वितरण; मार्केट यार्ड परिसरातील स्थिती

घरपोच गॅसचे रस्त्यावरच वितरण; मार्केट यार्ड परिसरातील स्थिती

Published on

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा: स्वयंपाकासाठी लागणारा घरगुती गॅस हा घरपोच वितरीत होणे अपेक्षित असताना मार्केट यार्ड परिसरातील विविध कंपन्याच्या गॅस वितरक एजन्सीकडून रस्त्यावरच वितरीत केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना घरापर्यंत गॅस घेऊन जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मार्केट यार्ड परिसरात गॅस वितरणाची तीन मोठी केंद्रे असून, काहींची गोडाऊन दूर आहेत. काहींची गोडाऊन मार्केट यार्डातील धान्य बाजारात आहेत. मार्केट यार्ड परिसरात गोडाऊन नसल्यामुळे गॅस बुकिंग करून घेतल्यानंतर नागरिकांना शिवाजी पुतळ्याच्या समोर रस्त्याच्या कडेला सिलिंडरसाठी वाट पाहात बसावे लागते.

त्यात कर्मचार्‍यांची अरेरावी, मालकाचा उद्धटपणा त्यामुळे ग्राहक पहिलेच त्रासून गेलेले आहेत. गाडी वेळेवर येत नाही, त्यामुळे ग्राहकांना फुटपाथवर बसूनच गॅससिलिंडरच्या गाडीची वाट पाहात बसावे लागते. याबाबत गॅस वितरण कंपनीच्या प्रमुख वितरकाकडून उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत. मार्केट यार्ड आंबेडकरनगर, प्रेमनगर, आनंदनगर इत्यादी परिसरातील एकच टाकी असणार्‍या ग्राहकाला मात्र या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. परिणामी ग्राहकांची गळचेपी मोठ्या प्रमाणात होते तर काही वेळा अव्वाच्या सवा रक्कम मागितली जाते, अशावेळी गॅस ग्राहकांनी करायचे काय हा प्रश्न पडतो.

जर गॅस वितरकांच्या कार्यालयापासून गॅस ग्राहकांनी उचलला तर मूळ किमतीत 20 रुपये त्यांचे कमी घेणे नियमानुसार असते, परंतु ग्राहकांना याबाबत माहिती नसल्यामुळे गॅस वितरक सर्रासपणे ग्राहकांची लूट करत आहेत . "मार्केट यार्डातील धान्य बाजारात तीन ठिकाणी ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. या ठिकाणी अपघात होऊन धोका होऊ शकतो, पण त्याकडे वितरण कंपनी किंवा वितरकाचे लक्ष नाही," असे मार्केट यार्डातील ग्राहक परमेश्वर हुसगे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news