ग्रामीण जीवनशैलीचा पुणेकर घेणार अनुभव; ‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम

ग्रामीण जीवनशैलीचा पुणेकर घेणार अनुभव; ‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'येणार्‍या पिढीला गंभीर परिणाम भोगावे लागू नयेत, यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचे आचरण करण्याची गरज लक्षात घेऊन वनराई संस्थेने यंदा 36 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे,' अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया आणि सचिव अमित वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन मित्रमंडळ चौकातील वनराई संस्थेच्या आवारात रविवारी (दि. 10 जुलै) सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत असून, सर्वांसाठी विनामूल्य आहे.

प्रदर्शनात प्रामुख्याने सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, बायोगॅस, निर्धूर चुली, बांबूची सायकल तसेच बांबू, दगड व मातीच्या पर्यायी वस्तू, पर्यावरणविषयक पुस्तके, मासिके, परसबागेत, छतावर व बाल्कनीत विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन व त्याबाबतची उत्पादने, देशी बियाणे, इलेक्ट्रिक सायकल, रसायनविरहित व विषमुक्त दैनंदिन गृहोपयोगी वस्तू, ग्रीन हिल्स, पुणे यांचे पर्यावरणविषयक चित्र व वस्तूंचे दालन इत्यादींचा समावेश या प्रदर्शनात असेल. याशिवाय 'आयुष आपके द्वार' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्रातर्फे सर्व नागरिकांना वनौषधी रोपांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news