गणेशोत्सव मंडळांना रोपांची भेट; वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी दत्त मंदिर ट्रस्टचा पुढाकार

गणेशोत्सव मंडळांना रोपांची भेट; वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी दत्त मंदिर ट्रस्टचा पुढाकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) गुरुपौर्णिमा उत्सवांतर्गत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना 125 रोपांची भेट देण्यात आली. शहर व उपनगरातील गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परिसरात या वृक्षांचे रोपण व संवर्धन करुन हरित पुणे करिता हातभार लावावा, याउद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिरासमोरील श्री दत्त कला मंच उत्सवमंडपात झालेल्या कार्यक्रमाला अभिनेते माधव अभ्यंकर, रेखा अभ्यंकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने, सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सुनिल माने, राजेंद्र लांडगे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त राजू बलकवडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांची आरती झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना रोपे देण्यात आली.

साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ, एकता मित्र मंडळ अरणेश्वर, संजीवनी मित्र मंडळ सहकारनगर, शिवराज मित्र मंडळ येरवडा, अखिल रामनगर मित्र मंडळ येरवडा, श्री शनिपार मंडळ, विधायक मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी मंडळ कसबा पेठ, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ कोथरुड, श्री शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ, श्रीकृष्ण मंडळ कॅम्प. अखिल कापडगंज मित्र मंडळ रविवार पेठ, वीर शिवराज मित्र मंडळ गुरुवार पेठ, युगंधर मित्र मंडळ राष्ट्रीय हरित क्रांती पर्वती आदी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. राजू बलकवडे यांनी आभार मानले. दत्तमंदिर ट्रस्ट व डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ब्लड बँक, पिंपरी यांच्या तर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड व डॉ.जयश्री तोडकर यांच्या हस्ते झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news