खेड पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण 13 रोजी

खेड पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण 13 रोजी
Published on
Updated on

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा: खेड पंचायत समितीच्या 18 जागांची आरक्षण सोडत बुधवारी (दि. 13) होणार आहे. राजगुरुनगर येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात ही सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली. या सोडतीची प्रारूप प्रसिध्दी 15 जुलै रोजी केली जाणार आहे. आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना 15 ते 21 जुलैपर्यंत तहसीलदारांकडे दाखल करता येणार आहे. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांच्या आणि पंचायत समितीच्या गणनिहाय प्रारूप मतदार याद्या दि. 18 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

या यादीवर हरकती आणि सूचना 22 जुलैपर्यंत दाखल करण्याचा कालावधी आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि 31 मे पर्यंत अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या त्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 29 जुलै रोजी अधिप्रमाणित आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 8 ऑगस्ट 2022 रोजी मतदान केंद्रानिहाय मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news