‘खडकवासला’तून विसर्ग सुरूच!; सव्वादोन टीएमसी पाणी मुठा नदीत

‘खडकवासला’तून विसर्ग सुरूच!; सव्वादोन टीएमसी पाणी मुठा नदीत

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पावसाच्या आठवडाभराच्या संततधारेमुळे खडकवासला धरण चार दिवसांपासून शंभर टक्के भरून वाहत आहे. धरणातून आतापर्यंत 2.26 अब्ज घनफूट (टीएमसी) जादा पाणी मुठा नदीत सोडले आहे. अद्यापही खडकवासलातून 4,708 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाची उपयुक्त साठाक्षमता 1.97 टीएमसी आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. ते पाणी उजनी धरणाच्या जलाशयात पोहचत आहे. पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणक्षेत्रात संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत समाधानकारक साठा झाला आहे.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता साखळीत 15.94 टीएमसी (54.69 टक्के) पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 15 जुलैला एकूण 9.36 टीएमसी (32.12 टक्के) साठा होता. सिंहगड, खडकवासला भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पानशेत खोर्‍यात संततधार सुरू आहे. दिवसभरात खडकवासला येथे 6, टेमघर येथे 40, पानशेत येथे 30 व वरसगाव येथे 28 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत, वरसगाव धरणखोर्‍यात सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. सर्व धरणांत पाण्याची आवक सकाळच्या तुलनेत वाढली आहे.

धरण आजचा पाऊस टक्के टीएमसी पाणीसाठा
खडकवासला 6 98.41 1.92
पानशेत 30 55.08 10.82
वरसगाव 40 51.76 12.85
टेमघर 40 40.44 3.71
प एकूण पाणीसाठा : 54.68 टक्के / प टीएमसी : 15.95

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news