खडकवासला : संततधार पावसात राजगड-तोरणावर झुंबड!

खडकवासला : संततधार पावसात राजगड-तोरणावर झुंबड!
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: संततधार पावसात शेकडो पर्यटकांनी राजगड, तोरणा गडावर रविवारी (दि. 24) गर्दी केली होती. 'हर हर महादेव', 'जय शिवराय'च्या जयघोषात तरुण, महिला, मुले गडावर चढाई करीत होते. शनिवारी (दि. 23) मुंबईच्या माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह दोनशेहून अधिक मुंबईकरांनी राजगडावर शिवनामाचा जागर केला. रविवारी सकाळपासून गुंजवणे तसेच पाल खुर्द मार्गावर पर्यटकांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या.

प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुजाच्या मार्गावर पुरातत्व खात्याचे पहारेकरी, सुरक्षारक्षक आकाश कचरे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे बुरुजाच्या तटबंदीवर उभे राहून फोटो काढणार्‍या तसेच हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी कसरत करीत होते. डोंगर कपारीतील दुर्गम पाऊलवाटांनी चढाई करीत तोरणागडावर शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली. दाट धुक्यात गडाचा परिसर हरवून गेला होता. मढे घाट परिसरातही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news