खडकवासला : पासलकर स्मारकाच्या दायित्वाबाबत दिरंगाई

खडकवासला : पासलकर स्मारकाच्या दायित्वाबाबत दिरंगाई
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: 'सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकाचे सामाजिक दायित्व मराठा देशा फाउंडेशनला देण्यास प्रशासन राजकीय दबावामुळे दिरंगाई करीत आहे,' असा आरोप पासलकर यांच्या वारसदारांनी केला आहे. याबाबत सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर व शिवप्रेमी संघटनांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकार्‍यांना साकडे घालूनही चार महिने झाले आहेत. तरीही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. हे स्मारक संयुक्तपणे चालविण्याची मागणी 9 संस्थांनी महापालिकेकडे केली होती.

त्यामध्ये 7 संस्था अपात्र ठरल्या आहेत, तर उर्वरित दोन संस्थांत मराठा देशा फाउंडेशनचा समावेश आहे. असे असताना राजकीय दबावामुळे प्रशासन याबाबत निर्णय घेत नसल्याची तक्रार राजाभाऊ पासलकर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अठरापगड जातीच्या मावळ्यांसह तोलामोलाची साथ देऊन स्वराज्यरक्षणासाठी बलिदान देणारे वीर बाजी पासलकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पासलकर स्मारकाची उभारणी करण्यात आली.

त्यासाठी त्यांचे वंशज राजाभाऊ पासलकर व शिवप्रेमी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, स्मारकाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. उर्वरित काम पूर्ण करता यावे तसेच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्मारकाचे दायित्व मराठा देशा फाउंडेशनला देण्यात यावे, अशी मागणी राजाभाऊ पासलकर, अविनाश पासलकर, लालासाहेब पासलकर, संजय पासलकर, द. स. पोळेकर आदींनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news