कोरोना रुग्णांची संख्या घटतेय; पुणे शहरासह जिल्ह्यालाही दिलासा

कोरोना रुग्णांची संख्या घटतेय; पुणे शहरासह जिल्ह्यालाही दिलासा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा आलेख उतरत असताना पुणे जिल्ह्याचा आलेख वाढत होता. आता मात्र पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. 19 ते 25 जुलै या कालावधीत जिल्ह्यात 4757 रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले. यामध्ये शहरातील 2664 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाची चौथी लाट चार-पाच आठवडे चालेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला होता.

राज्यात रुग्णवाढीला मुंबईपासून सुरुवात झाली. मुंबईतील रुग्णसंख्या तीन आठवड्यांनी काहीशी कमी होऊ लागल्यावर पुणे, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नोंदवण्यात आले. आता मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 4 ते 10 जुलै या कालावधीत राज्यातील रुग्णसंख्या 22 हजार 155 इतकी होती. 11 जुलै ते 18 जुलै या आठवड्यात रुग्णसंख्या 18 हजारांपर्यंत कमी झाली.

सरत्या आठवड्यात म्हणजेच 19 जुलै ते 25 जुलै या कालावधीत राज्यातील रुग्णसंख्या 14 हजार 544 इतकी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ओसरत आहे. मात्र, त्याचवेळी इतर साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. 19 जुलै ते 25 जुलै या कालावधीत पुणे शहरात 2664, पिंपरी चिंचवडमध्ये 1241, तर पुणे ग्रामीणमध्ये 872 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. सध्याचे सर्वाधिक रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटच्या उपप्रकाराचे असल्याने संसर्गाची तीव्र ता अतिशय सौम्य आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागणा-या रुग्णांचे प्रमाण 3 ते 4 टक्केच आहे.

आठवड्यातील बाधित
दिनांक         पुणे           पिंपरी चिंचवड          ग्रामीण       एकूण
19 जुलै        441               207                    139          787
20 जुलै        441               225                     131         797
21 जुलै         391              172                     166         729
22 जुलै         506               210                    141         857
23 जुलै         394               198                     145         737
24 जुलै         346               163                      99          608
25 जुलै         125                66                       51           242
एकूण           2664            1241                     872         4757

सर्वाधिक सक्रिय पुणे जिल्ह्यात
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 25 जुलैच्या आकडेवारीनुसार, राज्यात 14 हजार 534 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यामध्ये 4989, मुंबईमध्ये 1826, नागपूरमध्ये 1492, ठाणे येथे 987 तर नाशिक जिल्ह्यात 712 सक्रिय रुग्ण आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news