कार्ला : भाजे धबधबा परिसर फुलला

कार्ला : भाजे धबधबा परिसर फुलला
Published on
Updated on

कार्ला : मावळ तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून, मावळातील सर्व पर्यटनस्थळी सुट्टी संधी साधून हजारो पर्यटक भेट देत आहेत. कार्ला परिसरातील लोहगड,विसापूर किल्ले तसेच भाजे येथील धबधब्यांना पर्यटकांनी पसंती देत असून पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेले होते.

कार्ला आई एकविरादेवी रोड तसेच कार्ला-मळवली रोडवर वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून पर्यटकांना तासन्तास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतुक कोंडीवर नियंत्रण कसे ठेववण्यसाठी दर शनिवारी, रविवारी मळवली स्टेशन तसेच कार्ला फाटा, वेहरगाव आई एकविरादेवी पायथा येथे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचा जास्तीचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

पावसाला जोरदार सुरुवात झाल्यामुळे वर्षाविहारासाठी मावळात येणार्‍या पर्यटकांनी पुणे- लोणावळा लोकल देखील तुडुंब भरुन येत असल्याने मळवली रेल्वेस्टेशनवर देखील गर्दी झालेली होती. पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत असल्याने स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाल्याने स्थानिक देखील आनंदीत झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news