कार्ला : एकवीरा विद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

कार्ला : एकवीरा विद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
Published on
Updated on

कार्ला : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कालेजमध्ये विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व खाऊ वाटप करत करण्यात आले. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा गोपाळे, सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, प्राचार्य कैलास पारधी, सदस्या उज्वला गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन शाळेत करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर लहान मुलांचा किलबिलट शाळेत सुरु झाल्याने एक वेगळेच चैतन्य शाळेत निर्माण झाले होते. या वेळी एकवररा विद्या मंदिर शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय भेगडे व सचिव संतोष खांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news