औंध रस्त्यावरील खड्डे बुजविले

औंध रस्त्यावरील खड्डे बुजविले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून औंध रस्त्यावरील नागरिक आणि वाहनचालक खड्ड्यांना त्रासले होते. येथून ये-जा करणार्‍या वाहनाचालकांना अनेक अडचणी येत होत्या. आता हे खड्डे बुजविण्यात आले असून, स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. औंध रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहनाचालकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. खड्ड्यांमधून वाहन काढणेही चालकांसाठी कसरतीचे होत होते.

काही वेळा तर वाहतूक कोंडीचा सामनाही चालकांना करावा लागत होता. याला वाहनचालक वैतागले होते. दै. पुढारीने औंध रस्त्यावरील खड्ड्यांचा हा प्रश्न बातमीद्वारे 13 जुलैच्या अंकात मांडला होता. त्यात औंध रस्त्यावरील खडकी रेल्वेस्थानकाजवळील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत होती. पण, आता औंध रस्त्यावरील खड्डे महापालिकेमार्फत बुजविण्यात आले असून, यामुळे आता वाहनचालकांना येथून ये-जा करणे सोयीचे होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news