एरो-मॉडेलिंगद्वारे बाप-लेकाचा विक्रम; आशियाई बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एरोमॉडेल उड्डाण रिमोटव्दारे प्रात्यक्षिक सादरीकरणानंतर अमित तक्ते, मुलगा वेद, कॅप्टन शैलेश चारभे, शीतल महाजन.
एरोमॉडेल उड्डाण रिमोटव्दारे प्रात्यक्षिक सादरीकरणानंतर अमित तक्ते, मुलगा वेद, कॅप्टन शैलेश चारभे, शीतल महाजन.
Published on
Updated on

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: दिवसाच्या प्रखर उजेडात एरो-मॉडेलिंग शो ही सामान्य बाब. मात्र, रात्रीच्या काळोखात आणि बंदिस्त जागेत उजेडाचा कसलाही स्रोत नसताना एरोमॉडेलिंग शो करणे अतिशय अवघड असते. मात्र, असे अवघड आव्हान पेलत यशस्वी एरोमॉडेलिंग करण्याचा विक्रम पुण्यातील एका वडील आणि मुलाने केला. असा विक्रम हा आशिया खंडातील पहिलाच असून, त्याबद्दल वडील अमित तक्ते आणि मुलगा वेद तक्ते (वय 17) यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या महानिर्देशन नागरी उड्डाण विभाग आणि हडपसर ग्लायडिंग सेंटर केंद्र यांच्या वतीने पुणे एरोस्पोर्टरकडून गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रम रचले गेले आहेत. त्यातीलच एक आगळा-वेगळा विक्रम म्हणजे कीर्तीमान ग्लाइडिंग केंद्र येथे रात्री साडेआठ वाजता रात्रीच्या काळोखात वडील अमित तक्ते आणि मुलगा वेद अमित तक्ते यांनी भारतामध्ये कधीच न केलेला एरोमॉडेलिंगचा विक्रम केला. हा आशियाई विक्रम असल्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रथम मुलगा वेद अमित तक्ते याने आपल्या एरोमॉडेलवर कमीतकमी एलईडी लाईट लावून रात्रीच्या काळोखात ज्याला '4 डी फ्लाईंग' म्हटले जाते अशा ग्लाइडिंग केंद्र पुणेच्या हँगरमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवून 'सोलो इव्हेंट' म्हणून प्रथम विक्रम स्थापित केला. वडील अमित तक्ते यांनी आपल्या फायटर मॉडेल ज्याचा वेग खूप जास्त असतो. अशा फायटर मॉडेलवरती एलईडी लाईट लावून मुलगा वेद तक्तेच्या बरोबर एकाच वेळेस दोन्ही एरोमॉडेल एकत्र उडवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

हे दोन्ही मॉडेल रात्रीच्या काळोखात एका कमी जागेमध्ये उडविण्यासाठी अतिशय कौशल्य, एकाग्रता आणि कठोर अभ्यासाची गरज असते. अवघ्या 4-5 दिवसांच्या अभ्यास सत्रात अमित तक्ते यांना काही अडचणीमुळे पाहिजे तसा सराव करता आला नाही, तरी देखील दोघा बाप-लेकांनी अवघ्या पाच दिवसांमध्ये यशस्वी केला. लवकरच हे विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविले जातील, अशी आशा आहे. याप्रसंगी ग्लाइडिंग केंद्र पुणेचे प्रमुख कैप्टन शैलेश चारभे, शीतल महाजन, विंग कमांडर तरुण चौधरी शौर्यचक्र आणि एरोमॉडेलिंगचे ग्रुप प्रमुख अमित घंडे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news