एनआयआरएफ रँकिंगमध्ये राज्यातील बारा संस्था

एनआयआरएफ रँकिंगमध्ये राज्यातील बारा संस्था
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रोमवर्कफ अर्थात एनआयआरएफ रँकिंगमध्ये सर्वसाधारण यादीतील पहिल्या शंभर उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील बारा संस्थांनी स्थान मिळवले आहे. क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबई वगळता राज्यातील अन्य संस्थांच्या स्थानांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची
घसरण झाली, तर मुंबई विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2022 साठीची एनआयआरएफ क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली. संशोधन आणि व्यावसायिकता, अध्ययन आणि स्रोत, अध्यापन, प्रचार आणि सर्वसमावेशकता अशा निकषांवर देशभरातील संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. आयआयटी मद्रास, बंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी रूरकी, आयआयटी गुवाहाटी, दिल्लीची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या संस्था देशातील पहिल्या दहा संस्थामध्ये आहेत.

राज्यातील शिक्षण संस्थांचा विचार केल्यास आयआयटी मुंबईने गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही तिसरे स्थान कायम राखले आहे. तर अन्य संस्थांच्या क्रमवारीत उलथापालथ झाली आहे. गेल्यावर्षी 36व्या स्थानी असलेल्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने यंदा 33वे, 68व्या स्थानी असलेल्या पुण्याच्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने 62वे, 80व्या स्थानी असलेल्या पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने यंदा 76वे, 94व्या स्थानी असलेल्या मुंबईच्या नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने यंदा 89वे, 96व्या स्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाने यंदा 81वे, 100व्या स्थानी असलेल्या वर्ध्याच्या दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने यंदा 92वे स्थान मिळवत कामगिरी उंचावली.

20व्या स्थानी असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यंदा 25व्या, 24व्या स्थानी असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्चला (आयसर पुणे) यंदा 26वे, 27व्या स्थानी असलेल्या मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इन्स्टिट्यूटने यंदा 28वे, 54व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल़ॉजीने यंदा 68वे, 70व्या स्थानी असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला यंदा 99वे स्थान मिळाले आहे. विद्यापीठ गटातील पहिल्या पन्नास विद्यापीठांत राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 12वे, पुण्याचे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला 32वे, पुण्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला यांनी स्थान मिळाले.

महाविद्यालय गटातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय 57व्या, मुंबईचे कॉलेज ऑफ सोशल वर्क 69व्या, मुंबईचे सेंट झेवियर्स 87व्या स्थानी आहे. संशोधन संस्थांतील पहिल्या पन्नास संस्थांमध्ये आयआयटी मुंबई चौथ्या, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 11व्या, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च 17व्या, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट 17व्या, आयसर पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 25व्या स्थानी आहे. अभियांत्रिकी संस्थांच्या गटात आयआयटी मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल़ॉजी, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांना पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पहिल्या पन्नास संस्थांत समावेश
वैद्यकीय संस्था गटातील पहिल्या पन्नास संस्थांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मुंबईचे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news