उत्तम जानकर, धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

उत्तम जानकर, धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे विरोधक असलेले उत्तम जानकर पुण्यात एकत्र बघण्यास मिळाले. तुतारी हाती घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सूचक विधान जानकर यांनी केले असून, लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) असलेले उत्तम जानकर यांनी बुधवारी (दि. 17) शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.
मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून उत्तम जानकर यांना ओळखले जाते.
नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर लगोलग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीप्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते. आपण कार्यकर्त्यांशी बोलून येत्या शुक्रवारी (दि. 19) भूमिका जाहीर करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले, तर मोहिते पाटील आणि जानकर या दोघांनी आम्ही एकत्र येऊन काम करावे, अशी पवारसाहेबांची इच्छा असल्याचे सांगितले.
जानकर म्हणाले, मोहिते पाटील आणि आमच्यातील वैर संपून निवडणुकीत एकत्र यावे, असे शरद पवारांचे मत होते. पण, आम्ही
एकमेकांविरोधात लढलो असल्याने अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडण्याबाबत एक बैठक झाली आहे. दोन-तीन दिवसांत दुसरी बैठक होणार आहे. एकमेकांना सहकार्य होऊ शकते का? मोहिते पाटील आणि आमच्यातील वैर कसे थांबणार आणि काही कामांबद्दल बैठकीत चर्चा झाली.
नागपूरला जाण्यासाठी केलेला विमान खर्च वाया जाणार का? या प्रश्नावर जानकर म्हणाले की, विमानात आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी चर्चा झाली. विमानात झालेले मुद्दे 19 एप्रिलला कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात येणार आहेत, त्यानंतर कार्यकर्ते घेतील त्या निर्णयाबरोबर राहणार आहे. तुतारी हाती घ्यावी, अशी काहींची इच्छा आहे. पण, अन्य काही कार्यकर्त्यांची मतमतांतरे असू शकतात. विरोधकांबरोबर जाणे, हे थोडे अवघड काम आहे. मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून मी अजित पवारांच्या पक्षात आहे, असेही जानकर यांनी सांगितले.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news