इमारतीच्या डक्टमध्ये कामगाराचा मृतदेह; सहकारनगर येथील घटना

इमारतीच्या डक्टमध्ये कामगाराचा मृतदेह; सहकारनगर येथील घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सहकारनगरमधील कोहिनूर सोसायटीत नव्याने बांधकाम होत असलेल्या स्वरांजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूमच्या डक्टमध्ये रविवारी (दि.10) दुपारी कामगाराचा मृतदेह आढळून आला. संबंधित कामगार मूळ बिहारचा असून, कामासाठी तो मागील काही दिवसांपासून इमारतीमधील लेबर कॅम्पमध्येच राहात होता. रामबाबू तिलकराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दत्तवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. कोहिनूर सोसायटीतील स्वरांजली या इमारतीचे काम सुरू आहे.

येथील लेबर कॅम्पमध्ये तिलकराम हा वास्तव्यास होता. शनिवारी रात्री त्याने दारू पिल्याची महिती समोर आली आहे. रविवारी सकाळी लेबर कॅम्पमधील मुकादमाला पहिल्या मजल्यावरील बाथरूमच्या डक्टमध्ये तिलकराम याचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्याने पोलिसांना ही माहिती दिली. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन जवांनाच्या मदतीने तिलकराम याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news