

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आषाढी एकादशीकरिता रेल्वेच्या वतीने 9 विविध मार्गांवरून 48 विशेष रेल्वेगाड्या पंढरपूरच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत. यात मध्य रेल्वे दिनांक 5 ते 14 जुलै 2022 दरम्यान लातूर-पंढरपूर, मिरज- पंढरपूर, मिरज – कुर्डूवाडी, पंढरपूर -मिरज, सोलापूर – पंढरपूर, नागपूर – मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती – पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूरदरम्यान या आषाढी विशेष गाड्या चालणार आहेत. यातील काही रेल्वे पूर्ण अनारक्षित असणार आहेत. प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंढरपूर गाड्यांचे वेळापत्रक
लातूर-पंढरपूर ही विशेष गाडी लातूर येथून दि. 5, 6, 8, 11, 12, आणि 13 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. मिरज-पंढरपूर अनारक्षित विशेष रेल्वे मिरज येथून 5 ते 14 जुलैदरम्यान दररोज सकाळी 5 वाजता सुटेल. मिरज-कुर्डूवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष रेल्वे मिरज येथून 5 ते 14 जुलैदरम्यान दररोज दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. पंढरपूर-मिरज विशेष ही रेल्वेगाडी पंढरपूर येथून दि. 4, 5, 9 आणि 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुटेल.
सोलापूर-पंढरपूर अनारक्षित डेमू विशेष रेल्वे सोलापूर येथून 5 ते 14 जुलैदरम्यान दररोज सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. नागपूर-मिरज विशेष रेल्वे दिनांक 6 आणि 9 जुलै रोजी नागपूर येथून सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वे दिनांक 7 आणि 10 जुलै रोजी नागपूर येथून सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. नवीन अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वे दिनांक 6 आणि 9 जुलै रोजी अमरावती येथून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुटेल. खामगाव-पंढरपूर विशेष रेल्वे दिनांक 7 आणि 10 जुलै रोजी खामगाव येथून सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.