आता बायोसीएनजीवर धावणार पीएमपीच्या गाड्या; आयुक्तांच्या हस्ते आज उद्घाटन

आता बायोसीएनजीवर धावणार पीएमपीच्या गाड्या; आयुक्तांच्या हस्ते आज उद्घाटन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कचर्‍यापासून तयार झालेल्या बायोसीएनजीवर आता पीएमपीच्या सीएनजीवरील बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन बसचे नियोजन करण्यात आले असून, शुक्रवारी ( दि.1) महापालिका भवन येथे आयुक्तांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पीएमपीने पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. याकरिता पीएमपीने इलेक्ट्रिकवर धावणार्‍या आणि सीएनजीवरील बस खरेदी केल्या आहेत.

तसेच ताफ्यातील डिझेलवरील सर्व बस ताफ्यातून काढून टाकण्यात आल्या आहेत. यातच आता पीएमपी कचर्‍यापासून निर्मिती होणार्‍या बायोसीएनजीवर पीएमपीच्या बस गाड्या सुरू करणार आहे. ताफ्यातील सीएनजी बस आता बायोसीएनजी भरून शहरात प्रवासी सेवा पुरवतील. पीएमपीला बायोसीएनजी सोमाटणे फाटा येथे उपलब्ध होणार आहे. दिवसाला बायोसीएनजी पंपावर सुरुवातीला पीएमपीच्या 15 बसला पुरेल, इतक्या गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे.

अशी आहे स्थिती…
पीएमपीकडील सीएनजी बस – 622
पहिल्या टप्प्यात – 15 बस बायोसीएनजीवर
एका बसची क्षमता – 100 किलो गॅस
गॅसची किंमत – 80 रुपये प्रतिकिलो
एमएनजीएलपेक्षा 10 पैशांनी मिळणार स्वस्त
बायोसीएनजीचा इंजिनवर परिणाम नाही
बायोसीएनजीचा गाडीच्या इंजिन, अ‍ॅव्हरेजवर आणि तांत्रिक गोष्टींवर कोणताही परिणाम होणार नाही. याबाबत पीएमपीकडून बसमध्ये बायोसीएनजीद्वारे चाचणी करण्यात आली आहे, असे पीएमपीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

पीएमपीच्या गाड्या आता बायोसीएनजीच्या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहोत. पहिल्या टप्प्यात दोन गाड्या असून, त्याचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करणार आहे. त्यानंतर 15 गाड्या दररोज बायोसीएनजीवर धावतील.

                                – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news