

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : आंदर मावळ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. संततधारेमुळे परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. या पावसामुळे परिसरातील शेतकर्यांची भात रोपांची लागवड करण्यासाठी लगबग सुरु होईल. धूळ वाफेवर पेरणी केलेल्या भात रोपासाठी पाऊस आवशक होता. .
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने काही ठिकाणची भात खाचरे भरू लागल्याचे चित्र होते. तसेच परिसरातील धबधब्यांतूनही थोड्या प्रमाणात ओहोळ वाहू लागल्याचे दिसून येत होते. पावसामुळे परिसरातील भात लागवड दोन टप्यात होणार असल्याचे चित्र आहे. काही शेतकर्यांनी विहीरीच्या पाण्यावर भात रोपे तयार केली होती.
करून ती भात रोपे लागवडी साठी आली आहे ही भात रोपे लागवडीला सुरुवात होऊ न धूळ वाफेवर भात पेरणी केलेली भात रोपे पंधरा ते वीस दिवसांनी लागवडीला येणार असल्याने परिसरात रोजगाराची कमतरता भासणार नाही परिसरात पाऊस सुरू झल्याने लागवडीसाठी अनेक गावांत (साथ ) करून कुल दैवताला नारळ देखील फोडले आहे असाच पाऊस पडत राहिला तर परिसरात भात लागवड लवकर होईल.