आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवणार, पुणे विमानतळाकडून खासगी कंपन्यांना प्रस्ताव

आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवणार, पुणे विमानतळाकडून खासगी कंपन्यांना प्रस्ताव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात पुणे विमानतळावरून सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, अबुधाबी या चार ठिकाणी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विमानतळ प्रशासनाने विमान कंपन्यांना यासंदर्भातील प्रस्ताव दिला असून, विमान कंपन्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.

सध्याच्या काळात दुबई या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होत आहे. खासदार गिरीश बापट यांच्याच प्रयत्नातून सिंगापूर, मलेशिया, बँकॉक आणि अबुधाबी या 4 ठिकाणी पुण्यातून उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. विमानतळ प्रशासनाने यासंदर्भातील नियोजन करण्याकरिता प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव खासगी विमान कंपन्यांना दिला आहे. खासगी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून याला मान्यता मिळाली की, लगेचच पुण्याहून आणखी चार ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे सुरू होतील, असा विश्वास पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी व्यक्त केला आहे.

विमान कंपन्यांच्या व्यवस्थापकांची बैठक
पुण्याहून सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, अबुधाबी या चार ठिकाणी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता नुकतीच विमानतळ प्रशासन, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार बापट आणि स्पाईस जेट, एअर इंडिया, विस्टारा, गो, इंडिगो, एअर एशिया या विमान कंपन्यांच्या व्यवस्थापकांची बैठक पार पडली. या वेळी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. खासगी कंपन्यांकडून यासंदर्भातील मान्यता वरिष्ठपातळीवर
घेण्यात येणार आहे.

पुणे विमानतळावर रात्रीचे स्लॉट उपलब्ध
पुणे विमानतळाचे विमानोड्डाणांचे नियोजित शेड्यूल दिवसभराचे फुल्ल असते. मग आंतरराष्ट्रीय विमाने येथून कशी उडणार? असा प्रश्न नक्कीच पडणार. मात्र, त्याची चिंता नसल्याचे सांगत, प्रशासनाने उड्डाणांसाठी रात्रीचे स्लॉट उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news