आ. पाटील यांच्या वाढदिवशी महामृत्युंजय सामूहिक मंत्रपठण; गणेश बिडकर यांच्याकडून आयोजन

महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठण करताना गणेश बिडकर यांच्यासह कुटुंबीय.
महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठण करताना गणेश बिडकर यांच्यासह कुटुंबीय.
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार पेठेतील श्री नागेश्वर मंदिर येथे महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.

महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार पाटील यांना उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि राजकीय कारकिर्दीसाठी या सामूहिक महामृत्युंजय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बिडकर सपत्नीक सहभागी झाले होते.

मंत्रोच्चाराने मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सोमवार पेठेतील नागरिकांनी हजेरी लावली होती. तेजस सप्तर्षी गुरुजी आणि त्यांच्या 27 सहकार्‍यांनी हे पठण केले. यावेळी सागर अफुवाले, उद्धव मराठे, मंदार पवार, सुजित पुजारी, राहुल शर्मा, माउली शिवले, सोमनाथ शेळके, सुमीत रांबाडे, प्रताप सावंत, दिलीप बहिरट, नीलेश अल्हाट यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news