अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर जप्त

सीबीआयने जप्त केलेले भोसले यांचे हेलिकॉप्टर.
सीबीआयने जप्त केलेले भोसले यांचे हेलिकॉप्टर.

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एक दणका देत त्यांचे हेलिकॉप्टर जप्त केले आहे. दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) माध्यमातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 17 बँकांच्या समूहाची 34 हजार 615 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. येस बँकेचे राणा कपूर यांच्या माध्यमातून अविनाश भोसले यांना 2018 साली 700 कोटींचे कर्ज देण्यात आले होते.

याच पैशांतून भोसले यांनी लंडनमधील संपत्तीसह आणखी काही मालमत्ता भोसले यांनी हेलिकॉप्टर खरेदी केल्याचा दावा करत सीबीआयने ही जप्तीची कारवाई केली आहे. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी मुंबईसह अन्य शहरांत छापेमारी करून महागडी घड्याळे, चित्रे, सोने आणि हिर्‍यांचे दागिने अशा साडेबारा कोटी रुपये किमतीच्या महागड्या वस्तू जप्त केल्या आहेत.

भोसले यांच्या मालकीच्या कंपनीला 68 कोटी 82 लाख रुपये हे सल्लागार फी म्हणून, तर 183 कोटी रुपये डीएचएफलकडून कर्ज म्हणून मिळाले. तर कंपनीने स्वत: 317 कोटी 40 लाख रुपये हे रेडियस समूहाकडून घेतले. पुढील तपासामध्ये या एकूण 569 कोटी 22 लाख रुपयांपैकी 300 कोटी रुपये अविनाश भोसले यांनी फाईव्ह स्ट्रँड येथे संपत्ती विकत घेण्यासाठी वापरले असून, तिची किंमत आता एक हजार कोटी इतकी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news