अबब..! रस्त्यापेक्षा चेंबर उंच

अबब..! रस्त्यापेक्षा चेंबर उंच
Published on
Updated on

तळवडे : देहू आळंदी रोडवर चिखली येथील मोठ्या नाल्यालगत कुदळवाडी चौकातील चेंबरची उंची रस्त्यापेक्षा अधिक झाल्यामुळे हा चेंबर वाहतुकीस अडथळा ठरत आहे; तसेच भरधाव येणार्‍या वाहन चालकांसाठी हा चेंबर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चिखली येथील कुदळवाडीहून टाटा मोटर्सकडे जाणार्‍या चौकात देहू- आळंदी या मुख्य रस्त्यावरील चेंबर रस्त्यास समतल न बांधल्याने तो अपघातास कारणीभूत ठरत आहे.

या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणीच प्रवासी वाहनांची वाट पहात थांबतात. अनेकदा भरधाव वाहनांना या चेंबरमुळे अपघातास सामोरे जावे लागल्याचे येथील स्थानिक रहिवासी सांगतात. चेंबरची उंची रस्त्यापेक्षा अधिक झाल्यामुळे येथून ये-जा करणार्‍या पादचार्‍यांनादेखील अडथळ्याची शर्यत ठरत आहे. काही दिवसांनी देहू तसेच आळंदी येथील पायी पालखी वारी सोहळ्यासाठी अनेक वारकरी या रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी येथील चेंबरीची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news