

मुंढवा, पुढारी वृत्तसेवा: केशवनगर येथील रेणुकामाता मंदिरापासून पुढे नदीपात्राकडे जाणार्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेने कारवाई केली आहे, येथील दहा होर्डिंग्ज जमिनदोस्त केले. केशवनगर येथील सुमारे सत्तर अनधिकृत होर्डिंग्जपैकी दहा होर्डिंग्जवर कारवाई झाली आहे. बाकी साठ होर्डिंग्जवर कधी कारवाई होणार, याचे उत्तर देण्यास पालिकेने टाळाटाळ केली.
पालिकेच्या परिमंडळ क्रमांक चारचे उपायुक्त संदीप कदम, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, आकाशचिन्ह विभागाचे अनिल डांगमाळी तसेच अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. केशवनगर चा पालिकेत समावेश होऊन पाच वर्षे झाली आहेत,
पण पालिका अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे येथे एकाही होर्डिंग्जला अद्याप करआकारणी झालेली नाही. याबाबत पुढारी ने सुद्धा वृत्त प्रसिद्ध केले होते. होर्डिंग्ज नियमित करण्याविषयी पालिका नोटीस पाठविते आणि होर्डिंग्जधारक त्याला केराची टोपली दाखवतात, असा प्रकार मागील पाच वर्षांपासून सुरू आहे.
हेही वाचा