Pune ZP schools German French Language Education: जिल्हा परिषद शाळांतील 12 हजार विद्यार्थ्यांना जर्मन-फ्रेंचचे धडे!

102 शाळांमध्ये परकीय भाषांचे शिक्षण सुरू; प्रशिक्षित शिक्षकांमार्फत इयत्ता 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांना आधुनिक भाषा शिकविण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम
ZP schools German French Language Education
ZP schools German French Language EducationPudhari
Published on
Updated on

गजानन शुक्ला

पुणे: जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी बहुभाषिक व्हावेत, असा प्रशासनाचा आग््राह असून त्यासाठी प्रत्यक्ष उपक्रमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या 102 शाळांतील शिक्षकांनी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परिणामी, जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वीतील जवळपास 12 हजार विद्यार्थ्यांना आता जर्मन व फ्रेंच भाषा शिकविण्यास सुरुवात झाली आहे.

ZP schools German French Language Education
Pune BJP Election Leadership Mohol Bidekar: मोहोळ–बिडकर जोडीवर भाजपची पुणे महापालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा

शिक्षकांना जर्मन व फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला होता. या करारानुसार 102 शिक्षकांना 180 तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यात दोन्ही भाषांतील शब्दसंपत्ती, उच्चार, काळ इत्यादी मूलभूत विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. आता हेच शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकवणार आहेत.

ZP schools German French Language Education
Pune BJP Core Committee Dispute Over Party Entry: पुणे भाजपच्या कोअर कमिटीमध्ये पक्षप्रवेशावरून खडाजंगी

‌‘फॉरेन लँग्वेज ऑनलाइन ॲप्लिकेशन‌’ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी आणि इंग््राजी भाषेत जर्मन व फेंच या भाषांतील अनुवादांसह व्हिडीओ आणि इतर अध्यापन साहित्य तयार करण्यात आले आहे. हे साहित्य पेनड्राइव्हच्या माध्यमातून शिक्षकांना नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळांमधील परदेशी भाषा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच शिकवण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ZP schools German French Language Education
Khed Missing Minor Girl Case: खेडमधून 17 वर्षीय मुलगी बेपत्ता; पळवून नेल्याचा संशय

शिक्षण अधिक सोपे आणि हलक्या पद्धतीने देण्यासाठी अध्यापनपद्धती तयार करण्यात आल्या आहेत. ग््राामीण आणि शहरी शाळांमधील परदेशी भाषा शिक्षणाला चालना देण्यासाठीचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. एकूण 102 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, यापैकी 70 शिक्षक जर्मन, तर 32 शिक्षक फ्रेंच भाषा शिकवणार आहेत. या शाळांची निवड ही त्या शिक्षकांच्या आधारे करण्यात आली आहे, ज्यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठात फ्रेंच आणि जर्मन भाषेतील फाउंडेशनल लर्निंग कोर्स केला आहे.

ZP schools German French Language Education
Pune Nashik Railway Route: बदलेला पुणे–नाशिक रेल्वेमार्ग: शेकडो हेक्टर जमीन वाया? चाकण जोडण्यावरच प्रश्न

याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, “पुणे जिल्हा परिषद, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाइन ॲप्लिकेशन यांच्या संयुक्त उपक्रमामुळे परदेशी भाषा शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास आणि शाळांमध्ये भाषा शिक्षण अधिक परिणामकारकपणे राबविण्यास निश्चितच मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news