

Ajit Pawar on Manikrao Kokate
पुणे: सतत वादग्रस्त बोलून वाद ओढवून घेणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांबद्दल जपून बोलण्याचा सल्ला दिला. तुमचे शेतकर्यांबाबतचे वक्तव्य मला महागात पडत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे अॅग्री हॅकेथॉन’ कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार माध्यमांशी बोलत होते. या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.(Latest Pune News)
पवार म्हणाले, ‘माणिकराव कोकाटे यांना यापूर्वीही शेतकर्यांबाबत बोलताना अशा प्रकारचे वक्तव्य करू नये, असे सांगितले होते. सगळ्याच गोष्टी आम्हाला माहीत आहेत. मीसुद्धा शेतकरी असून, काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. त्या मनात ठेवायच्या असतात. कोकाटे यांना मनात गोष्टी ठेवायची सवय नाही. हे असले वक्तव्य मलाही फार महागात पडते, असा टोलाही त्यांनी लगावला.