Traffic Fine Discount: सवलतीत दंड भरण्यास वाहनधारकांची झुंबड; येरवड्यातील लोकअदालतीमध्ये नियोजनाअभावी मोठी गैरसोय

चारशे ते पाचशे जणांनाच टोकन देऊन दंड भरून घेण्यासाठी प्रवेश देण्यात आला.
Traffic Fine Discount
सवलतीत दंड भरण्यास वाहनधारकांची झुंबड; येरवड्यातील लोकअदालतीमध्ये नियोजनाअभावी मोठी गैरसोयPudhari
Published on
Updated on

Yerwada Lok Adalat traffic fine payment

पुणे: लोकअदालतीत वाहतूक नियमभंगाचा दंड जास्तीत जास्त सवलतीत भरण्यासाठी वाहनचालकांनी शुक्रवारी (दि.12) सकाळपासून येरवड्यातील वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, चारशे ते पाचशे जणांनाच टोकन देऊन दंड भरून घेण्यासाठी प्रवेश देण्यात आला.

त्यात नागरिकांना जमिनीवर बसून आपल्या क्रमांकाची वाट पाहावी लागली, तर दंड भरून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेखीसाठी कोणी नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत ऑनलाइन किंवा ॲपद्वारे सवलतीत दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी या वेळी केली. (Latest Pune News)

Traffic Fine Discount
MHADA Housing: म्हाडाची मोठी गृहनिर्माण सोडत जाहीर; नागरिकांना स्वतःचे घर घेण्याची संधी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी वाहनचालकांवर आकारलेल्या ई-चलनाच्या दंडात पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने दिवसभर नागरिकांची झुंबड होती. वाहनचालकांचा दंड भरून घेण्यासाठी सुमारे पंचवीस ते तीस काउंटर लावण्यात आले होते.

मात्र, गर्दीच्या तुलनेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने; तसेच सर्व्हर कूर्मगतीने चालत असल्याने दंड भरण्यास वेळ लागत होता. खासगी प्रवासी कंपन्यांच्या वाहनांवरील मोठ्या रकमेचा प्रलंबित दंड भरण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनीही गर्दी केली होती.

परिणामी वैयक्तिक दंड भरण्यास आलेल्या दुचाकी-चारचाकी चालकांना तासन्तास रांगेत ताटकळतथांबावे लागले. सकाळी नऊनंतर वाहनचालकांची गर्दी प्रचंड वाढल्याने वाहतूक पोलिसांनी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. वाहनचालकांकडून दंड जमा करून घेणाऱ्या लोकअदालतीच्या पॅनेलचे सदस्य व स्वयंसेवकांचेही मोठे हाल झाले.

Traffic Fine Discount
Monsoon Withdrawal: यंदा 'या' तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासाला; मान्सून लवकर आला, त्यामुळे लवकर जाणार

वाहनचालकांची मोठी गर्दी झाल्याने अनेकांना दंड भरता आला नाही. वर्षातून चार वेळा लोकअदालतीचे आयोजन केले होते. त्यानुसार, 13 डिसेंबरलाही लोक अदालत होणार असून, त्या वेळीही वाहनचालकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. दंडात्मक ई-चलनाच्या नोटीसा आलेल्या नागरिकांना घरबसल्या दंडाचा भरणा करता येणार असून, त्यांना न्यायालयात येण्याची गरज नाही. वाहतूक नियमभंगाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नागरिकांनी न्यायालयात हजर राहून आपल्या प्रकरणाचा निपटारा करून घ्यावा.

- सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news