

पुणे: शहरासह पिंपरी चिचवड आणि जिल्ह्याला आज मंगळवार आणि उद्या बुधवार हे दोन्ही दिवस पावसाच्या ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर आकाशात ढग येऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
प्रचंड तापमानामुळे आकाशात पांढऱ्या ढगांची (क्युम्युनोलिंबस) गर्दी होत आहे. हे ढग अचानक विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस देतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. (Latest Pune News)
दरम्यान, रविवारी आणि सोमवारी शहरातील प्रचंड उकाडा किंचित कमी झाला होता. रविवारी शहराचे तापमान 36 तर सोमवारी दोन अंशांनी वाढून 38 अंशांवर गेले होते. शहरात पहाटे आणि सायंकाळी गारवा जाणवत आहे.
सोमवारचे शहरातील कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअस)
शिवाजीनगर 38 (21.7), पाषाण 38 (20.1), लोहगाव 41 (23.6), चिंचवड 37 (23.7), लवळे 38 (24.7), मगरपट्टा 38 (24.5), एनडीए 36 (19.2) कोरेगाव पार्क 38 (24.2).