Konkan Heavy Rain : सिंधुदुर्ग, रत्नागिरीला यलो अलर्ट

राज्यात मुसळधारेचा इशारा, सतर्कतेची सूचना जारी
Heavy Rain
Heavy RainPudhari
Published on
Updated on

पुणे : छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकत असून, याच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांश भागांत गुरुवारी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, या भागात सतर्कतेची सूचना जारी करण्यात आली आहे.

मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी या भागात पावसाची ओढ होती. मात्र, कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसांत या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

गुरुवारी इशारा असलेले जिल्हे

रेड अलर्ट : जळगाव. ऑरेंज अलर्ट : अमरावती, वर्धा, नागपूर, गाेंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे, रायगड, पुणे-सातारा-कोल्हापूर घाट.

यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, परभणी, हिंगोली तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news