

यवत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मधील अपघात निधनाची बातमी समजतात दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या केडगाव, यवत, बोरीपारधी येथील बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी साधारणपणे 9 वाचण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी सोशल मीडिया आणि विविध वृत्त माध्यमांच्या माध्यमातून केडगाव यवत परिसरात समजताच सर्वांना धक्का बसला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौंड तालुक्याशी एक वेगळे नाते कायमच राहिले आहे त्यामुळे या दुःखद घटनेने सर्व परिसर दुःखाच्या सावट खाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात बारामती मध्ये दाखल झाले आहेत