

पुणे: हप्त्यावर मोबाईल खरेदीसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून कोथरूड भागातील एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने या कागदपत्रांचा गैरवापर करून एक आयफोन आणि टॅबलेट खरेदी करीत 1 लाख 34 हजारांची फसवणूक करण्यात आली.
याबाबत एका महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोथरूड भागातील जयभवानीनगर वसाहतीत राहायला आहे. ती वनाज मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षक म्हणून काम करते. (Latest Pune News)
2022 मध्ये महिलेने कोथरूड भागातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणार्या दुकानातून मोबाइल हप्त्यावर खरेदी केला होता. त्या वेळी महिलेने हप्त्यावर मोबाइल खरेदीसाठी आधारकार्ड आणि पॅनकार्डची झेरॉक्स दिली होती.
आठ महिने महिलेच्या खात्यातून तीन हजार 99 रुपयांचा हप्ता कापण्यात आला. त्यानंतर ही महिलेच्या खात्यातून हप्त्याची रकम कापण्यात आली. हप्ते भरल्यानंतर रकम कापण्यात आल्यानंतर महिलेने बँकेत जाऊन विचारणा केली.
महिला इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणार्या दुकानात गेली. कर्ज विभागातील महिलेशी तिने संपर्क साधला. तेव्हा मोबाइल खरेदीच्या वेळी दिलेला धनादेश खात्यात पैसे नसल्या हप्ते कापण्यात आले, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने चौकशी केली.
तेव्हा महिलेच्या नावावर टॅबलेट, मोबाइल खरेदीसाछी कर्ज काढण्यात आल्याचे उघड झाले. या वस्तू बाणेर आणि वाकडमधील एका इलेक्ट्रॉनिक दालनातून खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली. या वस्तू खरेदीसाठी बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली.
तेव्हा कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी एका कर्मचार्याने लॉगइन केल्याची माहिती मिळाली. संबंधित कर्मचार्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा कर्ज विभागातील महिलेनेच गैरवापर करुन कर्जमंजुरी प्रक्रिया केली, तसेच 7 जानेवारी 2023 रोजी एका महिलेने दुकानातून मोबाइल खरेदी केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले.
त्यानंतर महिला आणि तिच्या पतीने कर्ज विभागातील महिलेनेची भेट घेतली. तेव्हा तिने महिलेने मोबाइल खरेदीसाठी दिलेल्या कागदत्रांचा दुरुपयोग केल्याची कबुली दिली. फिर्यादी महिलेच्या नावावर तिने आयफोन आणि टॅबलेट अशा एक लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या. आरोपी महिला पसार झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील तपास करत आहेत.