

पुणे: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते आता एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व घडामोडीदरम्यान सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन जर राज्याची सेवा करणार असतील तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्यास आनंद वाटणार. माझ्याही मनात तेच आहे, पण शेवटी तो त्यांचा विषय आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Latest Pune News)
राहुल गांधी यांचा लेख…
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहिला आहे. त्या लेखात महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यावर पवार साहेब आणि माझी चर्चा झाली. इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येतंय याची वाट पाहत आहोत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.